
मुंबई:
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने’ एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी ‘ ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्रजक्त तनपुरे यांची भेट घेऊन निवेदन दिले .व खालील मुद्यांवर चर्चा केली.राज्यातील महाविद्यालयांना आणि संबंधित विभागांना निर्देश द्यावेत अशी विनंती ही राष्ट्रवादी विद्यार्थीने केली आहे. यावेळी मुंबई अध्यक्ष अमोल मातेले उपस्थित होते.
●सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या शिक्षण शुल्कात ( Tuition Fee) सरसकट कपात करावी. त्याचबरोबर विदयार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत (Library, Laboratory, Internet, Development, Gymkhana, Education Tour, Annual Functions, etc.) त्याचे शुल्क आकारू नये.
●शिक्षण शुल्क समितीने लवकरात लवकर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शुल्क निच्छितीची पुन्हा प्रक्रिया करून नवीन शुल्क निच्छित करावे. तोपर्यंत कोणत्याही पालकांकडून शिक्षण संस्थाना शुल्क आकारण्याचा हक्क नाही,असा आदेश काढावा.
● ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षे पासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच त्याला महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये.
लवकरच संबंधित विभागाचे संचालक आणि अधिकारी यांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

