
वडगाव मावळ: संजय गांधी निराधार योजना अनुदान समितीच्या मावळ तालुका सदस्य पदी संदीप भोसलकर या दिव्यांग प्रतिनिधी ची प्रथमच निवड करण्यात आली. त्यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. 2002 ते 2008 या काळात ते कास्प प्लॅन, मावळ विद्या वाहीनी, कास्प मावळ युनिट च्या मार्फत क्षेत्रात सामाजिक कार्यातअग्रेसर होते, मागील 3 वर्षांपासून प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. दिव्यांग बांधवांना विविध प्रकारच्या शासकीय योजना व सामाजिक संस्था मार्फत विविध प्रकारचे सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – त्यांच्या कार्याची दखल घेत मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.

