वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे
येथे एका घरात सुरू असलेल्या जुगार
अड्डयावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने
छापा मारून कारवाई केली, यात पोलिसांनी दहा
लाख २६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई सोमवारी (दि. १४) सायंकाळी करण्यात
आली, हे घर शेतावर आहे.
उमाकांत जाधव यांच्या शेतातील घरामध्ये काही लोक अवैधरित्या, आर्थिक फायद्यासाठी पैशावर जुगार खेळत आहेत, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसारसोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता सापळा लावून जुगार अड्डयावर छापा टाकला,या घराचे दार बंद करून जुगार खेळाला जात असल्याची पोलीसांना कुणकुण होती.
याप्रकरणी घर मालक रवि रमाकांत जाधव (वय ४० , रा.
जाधववाडी, नवलाख उंब्रे ता. मावळ जि. पुणे), राजू
सिताराम दरवडे (वय ३८ रा. कान्हेवाडी, ता. मावळ, जि.
पुणे) व इतर १६ जण यांच्या विरोधात तळेगाव
एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान
कलम १८८,२६९ महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७चे
कलम ४,५ साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३
राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब)
महाराष्ट्र कोव्हिड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास
तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर
पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त
(गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.
प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे
यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके,
प्रणिल चौगले, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष
बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुठे, गणेश
कारोटे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, संगिता जाधव,
राजेश कोकाटे, जालिंदर गारे, सोनाली माने यांनी केली
आहे.

error: Content is protected !!