तळेगाव दाभाडे: हीलिंग हँड्स फाउंडेशन पुणे तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथे ४७ दिव्यांग व्यक्तींचे मोफत कोविडशीलड लसीकरण संपन्न करण्यात आले. हिलींग हँडस फाउंडेशन, पुणे आणि दिव्यांग विकास संस्था तळेगाव दाभाडे, ता.मावळ जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांच्या सहकार्याने रिक्रीएशन हॉल जनरल हॉस्पिटल तळेगाव येथे ४७ दिव्यांग लोकांचे कोविडशीलड चे मोफत लसीकरण करण्यात आले तालुक्यात सर्वत्र ४५ वर्षाच्या पुढील लोकांचे लसीकरण होते पण हिलींग हँडस फाउंडेशन, पुणे तर्फे १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लसीकरण देण्यात आले.हिलींग हँडस फाउंडेशन, पुणे च्या सेक्रेटरी डॉ. स्नेहल पोरवाल यांच्या मार्फत लस उपलब्ध करून देण्यात आली, तसेच संस्था समन्वयक मधुरा भाटे, शिबीर व्यवस्थापक अनिता सैद यांनी शिबिराचे चे सर्व नियोजन केले, संस्थेच्या परिचारिका अनुजा कदम यांनी लस दिली संस्थेचे कार्यकर्ते आनंद कुलकर्णी, सुमित तुपधर यांचे सहकार्य लाभले.दिव्यांग विकास संस्था तळेगाव, प्रहार मावळ तालुका यांच्या वतीने संदीप भोसलकर (अध्यक्ष), राजू चव्हाण, दत्ता लोंढे, किशोर कुलकर्णी, किशोर दिघे, किरण कर्पे यांनी सर्व दिव्यांग लोकांना एकत्र जमवण्यासाठी परिश्रम घेतले.प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथील मेडिकल ऑफिसर डॉ.वामन गेंगजे, डॉ. जयेश बिरारी, डॉ. पुंजाजी फोले यांनी रिक्रीएशन हॉल उपलब्ध करून दिले आणि सहकार्य केले. शिबिरास गावातील ग्रामस्थ, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांचे विशेष सहकार्य लाभले.

error: Content is protected !!