
कामशेत:
लहान मुलांची काळजी घेताना खबरदारी पाळा असे आवाहन महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी केले आहे.
• मुलांना वारंवार हात धुण्यास सांगा.
•बाहेर पडताना मास्क आवश्यक घाला
• मुलांना प्रेमाने समजवा.
• ५ ते १८ वयोगटातील मुलांनी मास्क वापरण अत्यंत गरजेचं आहे.
•२ ते ५ या वयोगटातील मुलांची इच्छा असेल तेव्हाच त्यांना ते घाला.
• सुती कपड्याचा मास्क मुलांसाठी योग्य आहे.
• गरज नसतांना मुलांना घराबाहेर पाठवू नका.
•लहान मुलांना शक्यतो व्हिडीओ कॉल किंवा फोनच्या माध्यमातूनच संपर्कात ठेवा.
• कोविड संसर्गची लक्षण आढळल्यास त्यांनी घरातील वृद्धांपासून दूर ठेवा.
●लहान मुलांमध्ये आढळून येतात ‘ही’ लक्षण
सतत ४-५ दिवस ताप येणे, जेवण न जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी होणे, मुलं सतत सुस्तावलेली असणे अशा प्रकारची कोणतीही लक्षणं लहान मुलांमध्ये आढळल्यास त्यांना त्वरीत डॉक्टरांकडे न्या.
गाईडलाईनप्रमाणे अशी घ्या मुलांची काळजी
•दररोज लहान मुलांना कोमट पाणी प्यायला द्या.
• दोन वर्षांवरील मुलांनी सकाळी व रात्री असं दोन वेळा ब्रश केलं पाहिजे.
•पाच वर्षांवरील मुलांची तेलाने मालिश करावी.
•मुलांकडून कोमट पाण्याच्या गुळण्या करुन घ्याव्यात.
•लहान मुलांच्या नाकात २ थेंब तेल टाकणं, प्राणायम करणे, ध्यान करणं असा शारीरिक अभ्यास मुलांकडून करुन घ्या.
दरम्यान, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना दररोज हळदीचं दूध, च्यवनप्राश, आयुर्वेदिक काढे दिले पाहिजेत. तसंच मुलांची पुरेशी झोप पूर्ण होणं गरजेचं आहे, संतुलित आहार देणंदेखील तितकंच गरजेचं आहे.

