
तळेगाव दाभाडे:
श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान अध्यक्षपदी अमर खळदे यांची,सचिवपदी मयूर पिंगळे यांची व खजिनदारपदी विराज टोंगळे यांची निवड करण्यात आली.
सदस्य पदी टकले संदीप ,गडसिंग दत्तात्रय भेगडे; प्रथमेश शेटे ,गौरव खळदे, सागर टकले ,चैतन्य जोशी, सागर लगड, अतुल काटे, संग्राम शिंदे ,स्वप्निल माने, अमोल पाटील यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी खंडूजी टकले, विजय शेटे ,विनोद टकले ,संजय शिंदे, विश्वास टोंगळे, संतोष परदेशी आदि मान्यवर उपस्थित होते.
संजय शिंदे म्हणाले,’ सुरुवातीला कठीण काळात आम्ही परिश्रम घेऊन प्रतिष्ठान स्थापन केले .प्रतिष्ठान स्थापन केल्यानंतर तेथे गुप्ते साहेब यांनी ॲम्बुलन्स दिली. ॲम्बुलन्स मुळे प्रतिष्ठान चे नावलौकिक झाले होते. आम्हाला विश्वास आहे ही नवीन कार्यकारणी सुद्धा चांगले काम करेल. समाजकारण चांगले करेल व येथील सर्वच पक्ष ची लोके आहेत .पण प्रतिष्ठानचे काम करताना राजकीय जोडी बाहेर ठेवेल .
मयूर पिंगळे म्हणाले ,” सामाजिक उपक्रम हे दरवर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातील. अमर खळदे यांनी सांगितले,” तुम्ही जी सामाजिक कार्यची जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकली त्याला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही. आभार विराज टोंगळे यांनी मानले.

