टाकवे बुद्रुक :
टाकवे बुद्रुक येथील सोएक्स इ. प्रा. लि. कंपनीची HT 22000 के. व्ही. लाईनचे खोदकाम नियम व अटी सोडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चौकशी साठी सोएक्सच्या व्यवस्थापनाने सार्वजनिक बांधकाम कार्यालयात हजर रहावे अशी नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
टाकवे बुद्रुक या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने भूमिगत इलेक्ट्रिक HT 22000 के.व्हि. लाईनचे काम चालू आहे सदर कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे,सा.बा.वि.वडगाव मावळ पंचायत समिती वडगाव मावळ यांची रितसर पूर्व परवानगी घेतलेली आहे, सदर कामाची परवानगी देत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने व पंचायत समितीने काही अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते पांडुरंग मोढवे, पांडुरंग असवले, विश्वनाथ असवले यांनी माहिती अधिकारात माहिती घेतली असता त्यात HT लाईनचे काम करत असताना रोडच्या मध्यापासून 12.5 मीटर लांबी , भूमिगत केबल ही जमिनीच्या पृष्ठभागापासून 1.5 मीटरच्या खोलीपर्यंत खोल गेली पाहिजेल ,1.5 खोलीवरती काम झाल्यावरती त्या HT लाईनवर 300 एम .एम.चे काँक्रीटचे आवरण असणे गरजेचे आहे.
परंतु त्या पद्धतीत काहीच काम झालेले नाही, रोडला लागूनच खोदकाम चालू आहे व 1.5 ते 2.5 फूट खाली खोदून केबल टाकण्याचे काम केलेले आहे, या कामात सोएक्स इंडिया प्रा.लि.कंपनी, इतर दोन कंपन्या व कॉन्ट्रॅक्टर कुचराई करून जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत आहे.आम्ही अर्जवरती प्रत्येक जण स्वाक्षरीकरणारे कामाला विरोध करत असताना आमच्यावरती दबाव आणला जात आहे, वारंवार या तीन कंपनीकडून धमकी दिली जात आहे.,आमच्या मधील कोणास ईजा अथवा दुर्घटना झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी या तीन कंपन्यावरती असेल कंपनीने 22000 के.व्ही. लाईनचे पूर्ण केलेल्या कामाची चौकशी व्हावी अशी अर्जदारांनी मागणी केली आहे.
आमचा HT लाईन कामास विरोध नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाने व पंचायत समिती वडगाव मावळने दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करून हे काम नियमानुसार पूर्ण करावे,असे अर्जदार कर्त्यांचे म्हणणे आहे.

तसेच आमच्या निवेदनाचा विचार न केल्यास आम्ही सर्वजण येत्या काही दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करु असे माजी सरपंच तुकाराम असवले,माजी चेअरमन राजू शिंदे,मावळ तालुका मनसे अध्यक्ष पांडुरंग असवले, महाराष्ट्र राज्य शिवक्रांती कामगार संघटना संघटक विश्वनाथ असवले,माजी सरपंच नवनाथ मोडवे,रामनाथ असवले, काळूराम काटकर,शिवाजी असवले,नितीन बांगरे,वसंत असवले,सामाजिक कार्यकर्ते दत्ता असवले,आदर्श शिक्षक सोपान असवले,चेतन असवले,चंद्रकांत मोडवे,उत्तम असवले,लक्ष्मण काटकर,अक्षय असवले यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
यावेळी वडगाव मावळ पोलीस स्टेशन,तहसील कार्यालय वडगाव मावळ,सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ पंचायत समिती वडगाव मावळ याठिकाणी निवेदने देण्यात आली होती,या निवेदनाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण केले असता, या एच टी केव्ही लाईनचे खोदकाम अटी व शर्ती यांचे उल्लंघन करून केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या तक्रारीची संबंधितबांधकाम विभागाने दखल घेतली.
कामात अटी शर्तीचे पालन नकेल्याने चौकशीसाठी २१जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव येथे उपस्थितीत राहण्याची नोटीस सोयक्स कंपनीला पाठविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नंदकुमार खोत यांनी दिली.
या प्रकरणी संबंधित अर्जदाराने प्रशासनाकडे नियमबाह्य होत होत असल्याची तक्रार केली होती.
या विरूद्ध सोएक्स कंपनीने पोलीसांनी या कामासाठी संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती,पोलीसांनी संबंधित अर्जदारांना नोटीस देऊन कामात अडथळा करू नये अशा सूचना दिल्या आहेत.

error: Content is protected !!