
कामशेत :
कामशेत येथील एका सराईत आरोपीला पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी कट्टे वदोन काडतुसासह कामशेत खिंडीत ताब्यात घेतले. प्रतिक अर्जुन निळकंठ (वय २१वर्ष) रा.कामशेत,
ता.मावळ, जि.पुणे असे ताब्यात घेतलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार,कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी चोरीचा समांतर तपास करत असताना
एलसीबीच्या पथकाला बातमीदाराकडून खबर
मिळाली की, कामशेत खिंडीत निळकंठ हा कंबरेला
पिस्टल लावून उभा आहे.
या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने कामशेत खिंडीत संशयित उभ्या असलेल्या निळकंठला ताब्यात घेऊन त्याची.अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना.व बेकायदेशीरपणे कमरेला लावलेले दोन गावठीपिस्टल व दोन काडतुसे, एक मोबाइल असा एकूण एक लाख सव्वीस हजार रुपयांचा चा मुद्देमाल हस्तगत केला.
स्थानिक गुन्हे शाखेचेवरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीसउपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, शब्बीर पठाण, प्रकाश वाघमारे, सुनिल जावळे, सचिन गायकवाड, मुकुंदआयचीत, गुरू जाधव, प्राण येवले यांच्या पथकानेकेली. शनिवारी ही कारवाई केली.

