वडगाव मावळ:
ग्रामसेवक संघटनेच्या मावळ तालुकाध्यक्ष पदी सतीश कालेकर व उपाध्यक्षपदी रविंद्र वाडेकर यांची निवड झाली .
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ शाखा वडगांव मावळ ची पंचवार्षिक निवडणूक वडगाव मावळ येथे घेण्यात आली .सन २०२१ ते २०२६ या कालावधी साठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत खालील प्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले.
ग्रामसेवक संघटना मावळ
नवनिर्वाचित कार्यकारणी
अध्यक्ष- श्री.सतीश कालेकर
उपाध्यक्ष- श्री. रवींद्र वाडेकर
सचिव- श्री. गोपिनाथ खोमणे
कोषाध्यक्ष- श्री. अमोल कोळी
सहसचिव- श्री. कैलास कोळी
सदस्य- श्री. बालाजी सुरवसे
सदस्य- श्री.राजेंद्र वाघमारे
सदस्य- श्रीम.माधुरी झेंडे
सदस्य- श्रीम. मोहिनी दौंडकर
खेड पंचायत समितीत कार्यरत असलेले बाळासाहेब मतकर,बाबाजी चव्हाण,सुरेश घनवट,देविदास आतार,शंकर ढोरे या सर्व ग्रामविकास अधिकारींनी निवडणूक निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मावळातील सुभाष बांगर, कैलास खेसे, तानाजी ओलेकर ,रवींद्र थोरात,जगजीवन मोढोरिया, प्रमिला घोडेकर ,दत्तात्रय जगताप, कल्याणी लोखंडे,राजेंद्र खरात या ज्येष्ठ सदस्यांनी महत्वाची भूमिका बजावली.