
तळेगाव दाभाडे:
प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या पुढाकारातून निगडे गावात कोरोना टेस्ट RTPCR तपासणी करण्यात आली .यावेळी हायरिक्स मध्ये असणा-या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले एकूण ६५ जणांची तपासणी करण्यात आली.
या उपक्रमासाठी विषेश सहकार्य सरपंच सविताताई बबुशा भांगरे, पोलीस पाटील संतोष भागवत, ग्रामसेवक शशिकिरण जाधव, दक्षता कमिटीच्या सदस्या कविता भांगरे, डॉ जयेश बिरारी , प्राची कोकणे ,ऐश्वर्या ठोंबरे, गौरी तळपे,जयश्री लोहकरे, वैभव आखाडे,आशा वर्कर योगिता शेजवळ, सुवर्णा शेलार ,लक्ष्मीबाई भागवत यांनी परिश्रम घेतले.
सरपंच सविता भांगरे म्हणाल्या, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर दक्षता घेण्यात आली होती,कोरोनाची जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली होती.प्रशासनाने दिलेल्या सुचनांच आम्ही वेळोवेळी पालन केले. आरोग्यविभागाने या काळात खूप मोलाचे सहकार्य केले.आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या लढाईत आमची लढाई सुरूच आहे.

