वडगाव मावळ:
आंबळे ग्रुप ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पूनम हनुमंत हांडे यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या उपसरपंच सुरेखा नखाते यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपच मोहन घोलप यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणूक बैठकीसाठी पूनम हांडे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला .
हांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याची सरपंच मोहन घोलप व ग्रामविकास अधिकारी प्रमोद बनसोडे यांनी घोषित केले.
ग्रामपंचायत सदस्य नवनाथ मोढवे ,रामदास शेटे, सुरेखा नखाते, कमल चतुर यांच्यासह माजी चेअरमन गोविंदराव आंभोरे,माजी चेअरमन ज्ञानेश्वर भांगरे,
पांडुरंग मोढवे बंजरंग मोढवे,शंकर आंभोरे (पाटील ), दत्ता वायकर ,गोरखशेट घोलप, बंडु घोजगे, शंकर आंभोरे ,भरत आंभोरे,श्रीकांत मोढवे,संदीप हांडे ,समीर कदम ,जगन्ननाथ हांडे ,हनुमंत हांडे ,चंद्रकांत घोलप, सूर्यकांत भांगरे , राजू आंभोरे ,प्रकाश बधाले, वसंत हांडे उपस्थित होते.
सरपंच मोहन घोलप म्हणाले,” ग्रामीण भागातील आमची ग्रामपंचायत महत्वाची ग्रामपंचायत आहे,तालुक्याच्या राजकारणात स्थानिक मंडळीचा दबदबा आहे. गावपातळीवरील विकास कामांसाठी स्थानिक पातळीवर झालेल्या निर्णयानुसार प्रत्येकाला संधी देण्याचे आमचे धोरण होते.
त्यानुसार आमची ग्रामपंचायतीतील उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध करण्यावर आमचा कल आहे. आंबळे ग्रामपंचायतीत आंबळे,मंगरूळ,शिरे,शेटेवाडी,कदमवाडी या गावांचा समावेश होतो. पंचवीस वर्षानंतर आंबळे गावात सरपंच आणि उपसरपंच पदाची संधी मिळाली आहे,या संधीचे सोने करून आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे करण्यावर आमचा भर आहे.
तळेगाव औद्योगिक टप्पा चार मध्ये आंबळे, निगडे ,कल्हाट,पवळेवाडी या गावांचा समावेश झाला आहे. भविष्यातील वाढते औद्योगिककरण व नागरीकरणाची चाहूल पाहून सुयोग्य नियोजनाचा ग्रामपंचायतीचा मानस आहे,यासाठी स्थानिक पातळीवरील वडीलधारी मंडळीचे आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे.
राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेली आणि भविष्यात औद्योगिकनगरी म्हणून उदयास येऊ पाहत असलेल्या या ग्रामपंचायतीच्या हद्दीत पर्यटन वाढीला मोठा वाव आहे.

error: Content is protected !!