सह्यादीच्या मुशीत ,इंद्रायणी आणि आंद्रा नदीच्या कुशीत निसर्गाने भरभरून दान दिलेल्या मावळ्यांच्या मातीत ग्रामीण पाश्वभूमी असलेल्या एका सामान्य शेतकरी कुटूंबात त्याचा जन्म…घरात आजी – आजोबा, मोठे चुलते-चुलती, आई-वडील, चुलत भावंड..असे गोकुळासारखे घर, शेतकरी कुटुंब, घरी गाई- म्हशी भरपूर..पाऊस उत्तम पडला.
तर घर अन्न धान्याने भरून जाई, सर्व सुखात होत पण एखाद्या वर्षी पाऊस व्यवस्थित पडला नाही तर थोडी अडचण व्हायची.. अशा पद्धतीने शेतीतील उत्पन्न शाश्वत नसल्यामुळे माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना मुंबईला पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला , अन गावातील इतर लोकांसारखेच वडील ही नोकरीसाठी मुंबईत स्थलांतरित झाले. वडिलांच्या आणि कुटूंबाच्या जीवनाला कलाटणी देणारी ही घटना, कारण कुटूंबाला आर्थिक स्थर्य प्राप्त झाले.
ते या नंतर च्या काळात आणि कौटूंबिक प्रगतीला सुरवात झाली. त्याचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.. इतरांच्या बालपणासारखेच शाळेतील अभ्यास आणि इतर वेळेस खेळ अन बागडण्यात बालपण अगदी मजेत कधी निघून गेले यांची जाणीवच झाली नाही..वडील मुंबईत स्थिरस्थावर झाल्यावर आई आणि दोघां भावंडांना मुंबईला घेऊन आली.त्या आधी दोनतीन वेळा तो मुंबईला जाऊन आला होताच.पण लहान असल्यामुळे काही जास्त लक्षात राहिले नाही पण लवकरच या शहराबरोबर आली नाळ नक्की जुळेल यांची खात्री झाली होती.
इयत्ता पाचवीला मुंबईला शाळेत गेल्यावर, श्री ज्ञानेश्वर विद्यामंदिर [कांदिवली मुंबई ] असे सुरेख नाव असलेल्या शाळेत प्रवेश निश्चित झाला आणि नव्या आयुष्याला दिशा मिळाली. स्वभाव लहान पणापासून शांत होता , कामापुरते बोलणे अन वायफळ बोलण्यापेक्षा इतरांचे ऐकणे हा उपजत स्वभाव , त्याचा उपयोग भविष्यात राजकीय क्षेत्रात आल्यावर झाला, शालेय जीवनात हुशार या बिरुद्वार शिकमोर्तब केल्याने अनेक अपेक्षा उराशी बाळगत आणि प्रसंगी त्या पूर्ण करत शालेय शिक्षण पूर्ण केले आणि प्रथम वर्गात गुण मिळवत तारुण्यात प्रवेश केला.
जीवनाला आकार आणि दिशा देण्याचे काम शाळेने केले..खूप छान शिक्षक या काळात भेटले त्यांनीच आयुष्याला दिशा दिली..आज जे काही आहे ते या शाळेत मिळालेल्या शिदोरीवर…याचं काळात टीव्ही वरील बातम्या पाहण्याचे व वाचनाचे वेड लागले, त्यातून सामाजिक प्रश्नांची जाणीव व राजकीय क्षेत्राबद्दल आकर्षण निर्माण झाले..
त्यातचं ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि भविष्यात संधी भेटली की राजकीय क्षेत्रात नशीब आजमावायचे हे मनाने पक्के केले..त्यातूनच कॉलेज जीवनात अनेक उपक्रमात सहभागी होऊ लागलो आणि व्यक्तिमत्त्व जडणघडण होऊ लागली.. वैयक्तिक जडणघडण भविष्यातील वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने महाविद्यालयीन अभ्यासात रस घेऊन उत्तम गुणांनी पदवी प्राप्त केली, या काळात राजकिय दृष्ट्या प्रगल्भता वाढत होती.आणि सन २०१५ मध्ये ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक सर्व सहकारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लढवली ,वयाच्या २२ व्या वर्षी उपसरपंच होण्याची संधी मिळाली आयुष्यात अतिशय आनंदी क्षण तोच होता.त्यानंतर मिञपरिवार ,ग्रामस्थ, तरुणवर्ग यांच्या साथीने गावात अनेक विकास कामे त्याचबरोबर धार्मिक व सामाजिक उपक्रम सर्वांच्या सोबतीने अतिशय चांगल्या प्रकारे पार पडले. या तरूणाचे नाव आहे,तुकाराम जाधव कशाळ ग्रुप ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच. आज त्याचा वाढदिवस आहे. या वाढदिवशी शुभेच्छा दिल्यावर तो म्हणाला,सामाजिक कार्यात सहभाग घेण्यात रस दिवसागणिक वाढत गेला.संपुर्ण काळात वडीलधारी मंडळी ,मिञपरिवार ,मार्गदर्शक यांच्या कडुन काही समाजपयोगी गोष्टी शिकायला मिळाल्या त्याचा फायदा नक्कीच पुढील वाटचालीस होईल .
नेहमीच कमी बोलून जास्त काम करणा-या या सहका-यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(शब्दांकन-सोमनाथ निवृत्ती जाधव )

error: Content is protected !!