स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहा: आमदार सुनिल शेळके

वडगाव मावळ:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूका पक्षाच्या चिन्हावर लढवून जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त वडगाव मावळ येथे झालेल्या कार्यक्रमात शेळके बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त कोरोनाच्या संकटात काम केलेल्या पत्रकार,आरोग्यसेविका,परिचारिका,डाॅक्टर,अंगणवाडी सेविका,मदतनीस,सफाई कामगार यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले,यावेळी झालेल्या मेळाव्यात शेळके बोलत होते. तत्पूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयासमोर पक्षाच्या झेंड्याचा ध्वजारोहण करण्यात आले.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,
राष्ट्रवादी पक्ष हा परिवार आहे.या परिवरात सहभागी झालेल्या वर आलेले अनुभव हे लोकहिताचे आहे. पंधरा महिन्यापूर्वी या पक्षात येऊन नेते आणि कार्यकर्ते यांचा विश्वास संपादन केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठी विकास कामे तालुक्यात खेचून आणील आहे,याचे समाधान आहे.
परंतू हा विकासच विरोधकांना खटकत असून,त्यांना आलेल्या अपयशाने ते खोटेनाटे आरोप करीत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपात आरोपात सत्यता असावी.त्यांनी केलेले राजकीय आरोप एकावेळेस सहन करीन,परंतू अर्थकारण करतो, भ्रष्टाचार आणि एखाद्या कुटूबियांच्या अन्यायाचा आरोप कदापी सहन करणार नाही. स्वाभिमानाने आम्ही काम करतोय याचे भान विरोधकानी ठेवावे.
आमदार शेळके पुढे म्हणाले,”
कोरोना संकटाच्या काळात आमचे सहकारी उत्तम काम करीत आहेत,रूग्णांच्या सेवेसाठी पाच रुग्णवाहिका,सहा कोविड सेंटर सुरू केले आहेत.कोरोना संकटात काही कुटुंबे उद्वस्त झाली आहेत. या संकटात ज्या कुटूबियांचे पालक गेले,त्या कुटुंबातील मुलांचा बारावी पर्यत शिक्षणाचा खर्च करणार आहे.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे,पक्षाला चांगले दिवस आले आहेत,त्यामुळे आमच्या अनेक सहका-यांना निवडणुकीत स्वप्न पडले आहेत,हे वर्षे निवडणुकीचे आहे,निवडणुकीला सामोरे जाताना विकास कामे पोहचावा. पक्षाची धोरणे पोहचावा. कामाला लागा अशा सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष,बबनराव भेगडे, कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबूराव वायकर, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशीकर,सदस्या शोभा कदम, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, उद्योजक सुनील भोंगाडे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष जालिंदर शेटे,गणेश काजळे,कृष्णा दाभोळे,अशोक घारे,सारीका शेळके, नगरसेविका संगीता शेळके, रूपाली दाभाडे, वैशाली दाभाडे, संघटनमंत्री नारायण ठाकर,सुनिता काळोखे, नगरसेवक सुनिल ढोरे ,नगरसेविका पूजा वहिले,माया चव्हाण, नगरसेविका मंगल भेगडे आदि उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे म्हणाले ,” मावळ तालुक्याने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या भूमिकेचे नेहमीच स्वागत केले आहे. मग ती भूमिका समाजवादी काँगेसची असो की, राष्ट्रवादी काँग्रेसची मावळाने पवार साहेबांचे समर्थन केले. मावळ तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची पार्श्वभूमी आहे.यापूर्वी च्या नेत्याच्या आदर्श परंपरेचे आठवण करून बबनराव भेगडे यांनी विरोधकांना सबुरीचा सल्ला दिला .
आदरणीय पवार साहेबांनी महिला व शेतकरी धोरण राबवून त्यांना सक्षम करण्यासाठी उचलेलया पावलांचे नेहमीच स्वागत होत आहे.,सहकारी संस्थाना त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे महाराष्ट्रात सहकार बळकट आहे. देशातील एकूण सहकारा पैकी साठ टक्के सहकार महाराष्ट्रात आहे.मावळातील जनतेने पवार साहेब,अजित दादा,सुप्रिया ताई यांच्या नेतृत्वाचे समर्थन दिले आहे,याकडे नव्या पिढीतील कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.सुभाष जाधव यांनी प्रास्ताविक केले.अतुल राऊत यांनी सुत्रसंचालन केले.

