वडगाव मावळ :
वडगाव नगरपंचायतीच्या नूतन इमारतीत पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र पत्रकार कक्षची व्यवस्था करावी अशी मागणी वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
आमदार सुनील शेळके व वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.वडगांव मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा,माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर
वाघमारे, माजी अध्यक्ष सुदेश गिरमे,माजी अध्यक्ष गणेश विनोदे यांनी ही मागणी केली आहे.
मावळ तालुक्यातील लोणावळा नगरपरिषदेत पत्रकारांना स्वतंत्र कक्ष आहे. तळेगाव नगरपरिषदेत वार्तांकनासाठी पत्रकारांना बसण्याची सोय आहे. येथून सभेचे कामकाज पाहता येते.
वडगाव नगरपंचायतीच्या स्वतंत्र इमारतीत पत्रकारांना स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!