कामशेत:
पावसाळा सुरू झाला आहे,वातावरणात बदल होत आहे. या बदलामुळे थंडी,ताप,डोकेदुखी,सर्दी,अंगदु:खी व्याधी होण्याची संभावना आहे.नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, साथीच्या आजारापासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजचे आहे,यासाठी सकस आहार घ्यावा असे आवाहन महावीर हाॅस्पिटलचे डाॅ.विकेश मुथा यांनी केले.
मृग नक्षत्राची चाहूल लागली आहे,कामशेतसह पंचक्रोशीत पावसाचे आगमन झाले आहे. कधी ऊन आणि पाऊस आपण अनुभवत आहोत. या अनुभवतात एकही नागरिक आजारी पडू नये,ही काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव आपण जाणतोच आहोत. आधीच कोरोनाने भीतीचे वाढली होती.सुदैवाने कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे .
ही आपल्या साठी आनंदाची बाब आहे,नागरिकाचे आरोग्य जपण्यासाठी शासनस्तरावर मोठया प्रमाणावर उपाय योजना राबवल्या जात आहेत. आरोग्ययंत्रणा सक्षमपणे आपले काम बजावत आहे. नागरिकांनी देखील वाढत्या आजारापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे गरजचे आहे.यासाठी योग,प्राणायाम, जाॅगींग केला पाहिजे. व्यायामाबरोबर सकस आहाराची गरज आहे.
रोजच्या आहारात फळे,हिरव्या पालेभाज्या,दूध याचा नियमित वापर केला पाहिजे असा सल्ला डॉ.विकेश मुथा यांनी दिला पावसाळा सगळ्यांच्या आवडतीचा ऋतू असला तरी या दिवसांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उदभवतात. मान्सून सुरू होताच आरोग्या बाबतीत समस्या डोकं वर काढतात. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषित पाण्याने आजार पसरतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते. रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. अशा वेळेस आहाराचे योग्य नियोजन असायला हवे. पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणार्‍या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात.
आषाढ, श्रावण, भाद्रपद या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा. मीठ आणि आंबट कमी असलेले जेवण करावे. लोणचे, चटणी, दही, अतितिखट पदार्थांचा समावेश आहारात करू नये.

error: Content is protected !!