
वडगाव मावळ:
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अंतर्गत कान्हे ग्रामपंचायतीस कुस्ती मॅट उपलब्ध करुन देण्यात आली.
कुस्तीमध्ये मातीबरोबरच मॅटवरील स्पर्धात्मक कुस्त्या मोठ्या प्रमाणावर खेळवल्या जातात. त्यामुळे मॅटवरील कुस्ती उदयोन्मुख खेळाडूंनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.
परंतु त्यासाठी मॅटवरील सराव देखील महत्त्वाचा आहे. या मॅटमुळे ग्रामीण भागातील खेळाडू या सुविधेपासून वंचित राहणार नाही. या मॅटचा उपयोग कुस्तीचा सराव करणाऱ्या खेळाडूंना होणार आहे.
यावेळी आमदार सुनिल शेळके,कान्हे ग्रामपंचायतीचे सरपंच विजय सातकर, उपसरपंच सौ.आशाताई समीर सातकर, ग्रामविकास अधिकारी एस.एन.शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गिरीश सातकर, महेश सातकर, श्री.संदीप ओव्हाळ, आरिफ मुलाणी, बाबाजी चोपडे, किशोर प्रभाकर सातकर, सोपान धिंदळे, अश्विनी शिंदे, रोहिणी चोपडे,सुजाता चोपडे, सौ.सुनिताताई चोपडे, सोनाली.सातकर, सौ.मनीषा ओव्हाळ, रूपाली कुटे उपस्थित होते.

