वडगांव मावळ: येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी १९८८ च्या बॅच च्या व्हटसअप ग्रुपकडून “सहारा वृध्दाश्रम” कुसवली, आंदर मावळ ह्या संस्थेस अन्न-धान्य वस्तू, कपडे व आर्थिक मदतीसाठी हे माजी विद्यार्थी पुढे धावले.
सहारा वृध्दाश्रमास वस्तू स्वरूपात मदत करावी अशी मागणी वृध्दाश्रम संस्थेने केली होती. ह्या पोस्टची दखल घेत ग्रुपचे ॲडमीन लेफ्टनन कर्नल विवेक गायकवाड यांनी ती पोस्ट ग्रुपवर शेअर केली. सामाजिक भावनेतून संस्थेस ग्रुपतर्फे मदत करावी असे कळकळीचे आव्हान त्यांनी केले. त्यास प्रतिसाद देत संजय कोकरे (उद्योजक) यांनी यासाठी पुढाकार घेतला.
श्री. कैलास पगडे, श्री.एकनाथ गाडे (उपसरपंच) जांभूळ, श्री.सुधाकर भोसले, श्री.प्रमोद वहिले(कामगार नेते), श्री.जॉनी मकासरे, श्री.प्रकाश जैन (उद्योजक) यांनी एकत्रित येऊन वरील सर्व साहित्य जमा केले व सहारा वृध्दाश्रम संस्थेचे प्रमुख श्री.विजय जगताप यांस ते शिवराज्याभिषेक सोहळा दिवसाच्या मुहूर्थाचे औचित्य साधून एक छोटासा देणगी कार्यक्रम घेत त्यांच्याकडे ते सुपूर्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनकार, प्रवचनकार व कीर्तनकार सौ. शारदा मुंडे यांनी शिवराज्याभिषेक निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार सांगून प्रबोधन केले.सहारा संस्थेचे संस्थापक विजय जगताप या प्रसंगी उपस्थित होते. सदस्य संजय कोकरे, कैलास पगडे, सुधाकर भोसले , एकनाथ गाडे, प्रमोद वहिले,अजय जाधव , जॉनी मकासरे, प्रमोद म्हाळसकर,ज्ञानेश्वर नखाते,संतोष खामकर, मंगेश बवरे, सोपान खांदवे, सलीम तांबोळी, ह्या सर्व ग्रुप सदस्यांनी सहभाग घेवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संजय कोकरे यांनी सामाजिक भान ठेवून संस्थेमध्ये वयोवृध्द लोकांचे आरोग्यविषयक शिबिर घेवून डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप वैयक्तिक खर्चातून करू असा संकल्प जाहीर केला.
वडगांव येथील देणगी कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सर्व सदस्यांनी सहारा वृध्दाश्रम कुसवली आंदर -मावळ येथे प्रत्यक्ष भेट देण्यासाठीचे नियोजन करून भेट दिली. सदर संस्थेने भेटीदरम्यान त्या ठिकाणी संस्थाचालक विजय जगताप ह्यांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला. शालेय ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आनंदी वातावरणात सहभाग घेत वृक्षारोपण केले.
कार्यक्रम प्रसंगी ग्रुप मधील सर्व उपस्थित सदस्य व देणगीरुपी मदत करणाऱ्या प्रत्येक सदस्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!