
वडगाव मावळ:
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंगळुन ग्रामपंचायतीमधील अनसुटे मानकुली या गावाचा विकास गेल्या काही वर्षांपासून रखडलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दखल घेतली जात नाही,वारंवार विचारपूस करून देखील गावाचा विकास होत नाही,अशी खंत भरत घाग या तरूणाने केली आहे.
इंगळुन ग्रामपंचायतीची गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामसभा भरवलेली नाही त्यामूळे गावात कोणती विकासाची कामे होतात कुठे होतात किती होतात याची कोणालाही माहिती नसते.
इंगळुन ग्रामपंचायतमध्ये एकूण 5 गावे आहेत (मानकुली/अनसुटे, कुणे, कुणेवाडी, पारिठेवाडी आणि इंगळुन) ही 5 गावे असून बाकी गावांमध्ये पिण्याचे पाणी हे रोज सोडले जते तर मानकुली/अनसुटे मध्ये कधी वेळेवर येतच नाही कधी कधी तर २ दिवसाने एकदा सोडतात.
गावातील कामांसाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांना वारंवार विचारपूस केली असता फक्त होकारार्थी उत्तरे दिली जातात परंतु प्रत्यक्षात कोणतीच कामे केली जात नाहीत.
ज्यामध्ये (गावात वाढलेले मच्छर त्यासाठी गावामध्ये धूर फवारणी आणि औषध फवारणी करणेे, जर लाईट गेली तर टँकरने पिण्याच्या पाण्याची सोय करणे, जर वीजपुरवठा जास्त दिवस खंडित झाला तर जनरेटची व्यवस्था करणे) आशा अनेक समस्या असतात याबद्दल विचारपूस केली असता फक्त करतो असे बोलल जात परंतु प्रत्यक्षात कोणतीच कामे केली जात नाहीत.
आजपर्यंत कधी ग्राम स्वच्छता अभियान राबवल नाही यावरून च समजतं ग्रामपंचायत कर्मचारी किती लक्ष देतात.ग्रामपंचायतीवर लक्ष न देणारे कर्मचारी निवडून येतात त्यामुळे तरूण मुलांनी नाराजी व्यक्त केली.

