टाकवे बुद्रुक : ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने शासनाच्या आदेशानुसार टाकवे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालया समोर भगव्या स्वराज्य ध्वजाची गुढी उभारुन शिवस्वराज दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भगव्या गुढीची विधीवत पुजा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रथमच आशा प्रकार ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज दिन साजरा होत, असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी सरपंच भुषण असवले,उपसरपंच संतु दगडे,पो.पाटील अतुल असवले, ग्रा.प.सदस्य ऋषीनाथ शिंदे,सोमनाथ असवले,परशुराम मालपोटे,संध्या असवले,प्रिया मालपोटे,प्रतिक्षा जाधव,सुवर्णा असवले, ज्योती आंबेकर,ग्रामविकास अधिकारी सुभाष बांगर,आंदर मावळ राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शेखर मालपोटे,माजी संचालक दिलीप आंबेकर,उद्योजक दत्तात्रय असवले तसेच ग्रामस्थ उपस्थितीत होते.

error: Content is protected !!