
पवनानगर(नवनाथ आढाव) :
पवनाधरण आणि परिसरात लॉकडाऊन असताना देखील पर्यटक विनाकारण फिरत आहेत. शनिवार व रविवार या विकेंड लॉकडाऊन काळात पवनानगर परिसरात मोकाट फिरणारांची संख्या वाढत असल्याने लोणावळा ग्रामीण पोलीस अंतर्गत पवना पोलिस मदत केंद्राकडून शेती व अत्यावश्यक सेवा वगळता मोकाट फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे.
मावळ तालुक्यातील कोरोना रूग्णसंख्या घटत असून ही साखळी तोडणे गरजेचे असून तरी देखील नागरिक विनाकारण फिरत आहे. तर काही जण लवकर दंड घ्या पण आम्हाला जाऊ दया अशी विनंती करताना दिसत आहेत. तर अनेक युवक आपल्या मित्रांना घेऊन पवना परिसरात येत आहे.
शनिवार रविवार असल्याने अनेक तरुण मोकाट फिरताना दिसले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहोत. पुढील काही काळ नागरीकांनी मोकाट फिरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लोणावळा ग्रामीण हद्दितील पवनानगर पोलिस मदत केंद्राअंतर्गत पवनानगर येथे लोणावळा ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना विजय गाले, पो ना . रफिक शेख, होमगार्ड भिमा वाळुंज ट्रॅफिक वॉर्डन श्रीकांत घरदाळे, आदींनी ही कारवाई केली.

