
वडगाव मावळ:
सोमवार दि. ७ जून,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष,तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश वसंतराव खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थदादा पवार फाऊंडेशनला पाच लाख रूपयांचा डिमांड ड्राफ्ट (डी.डी.) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला.
कोरोनाच्या संकटात पार्थदादा पवार फाऊंडेशन अत्यंत प्रभावी पणे काम करीत आहे. समाजातील गरजूंना मोफत रेशन वाटप,मोफत आरोग्य सुविधा,डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सारख्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळत आहे. या उपक्रमाची व्यापकता अधिक वाढवण्याचे हेतूने गणेश खांडगे मित्र परिवाराच्या वतीने ही भेट देण्यात आली.
त्याच बरोबर गरजूंना मोफत रेशन किट चे वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश राष्ट्रवादीचे माजी चिटणीस विक्रम कदम,मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक राज खांडभोर, विनायक कदम, नगरसेवक समीर खांडगे, रामदास वाडेकर,अविनाश पाटील, सुहास गरुड ,महेंद्र ओसवाल आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

