चांदखेड: जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधुन मावळ तालुक्यातील अखिल वारकरी संघाच्या वतीने संपुर्ण मावळ तालुक्यात २८ मे ते ६ जुन हा वृक्षारोपण सप्ताह आयोजित करण्यात आला.कोरोना महामारीच्या काळामध्ये मंदीरे,गावांमध्ये होणारे अखंड हरिनाम सप्ताह बंद असल्याने वारकरी संघाने आजचे पर्यावरण म्हणजे म्हणजे उद्याच्या पिढीच्या ऑक्सिजनची सोय या उद्देशाने  हा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला. मावळ तालुक्यातील अजिवली या ठिकाणापासुन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. संघाच्या वतीने चार हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ते समाजातील दानशुर व्यक्तींच्या सहकार्याने पुर्ण करण्याबरोबर काही गावातील ग्रामस्थांनी स्वतःहुन झाडे आणून दिली.त्यामुळे उद्दिष्टापेक्षा जास्त प्रमाणात झाडे लावण्यात आली यामध्ये आंबा,चिकू,फणस,बदाम अशी झाडे शेताच्या बांधावर तर वड,चिंच,कडुलिंब,ही झाडे सार्वजनिक जागेत व परसबागेत सोनचाफा,मोगरा,बकुळ,पारिजातक आदी झाडांचे रोपण करण्यात आले.पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन शिरगाव-परंदवडी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक सुनिल पिंजण तसेच श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसर ब्राम्हणवाडी(बऊर),यशवंतमहाराज फाले,युवामहिला किर्तनकार जयश्री येवले,अक्षयमहाराज येवले, अखिल वारकरी संघाच तालुकाध्यक्ष अनंतामहाराज लायगुडे,संपर्कप्रमुख शरदमहाराज घोटकुले,मकरंद ढम,नितिन म्हस्के, मधुकर महाराज गराडेचिंतामणी गिजे, अनिताताई ढोरे, निवृती भोईर,गणेश वाळुंजकर, विष्णू वाळुंजकर,प्रकाश वाळुंजकर, सुभाष म्हस्के, विश्वनाथ वाळुंज कर,लालामहाराज वाळुंजकर, ज्ञानेश्वर वाजे,सचिन येवले,चेतन सोनार,पोपट बराटे आदी मान्यवर उपस्थित होते.सप्ताहाची सांगता तालुक्यातील पाचाणे व सांगावडे या गावांमध्ये दि.६ जुन रोजी करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!