
वडगाव मावळ: जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कशाळ येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखून आपण या उपक्रमाचा प्राधान्याने विचार करत आहोत. सध्या निर्माण झालेला ऑक्सीजनचा तुटवडा, जमिनीची धूप, पावसाची अनियमितता, जंगलतोड, नष्ट पावत चाललेली वनराई, या आणि अशा अनेक कारणांमुळे वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे अत्यंत गरजेचे आहे.याच गोष्टींचा विचार करून आपण वाढदिवस साजरा करावा. उपसरपंच तुळशीराम जाधव म्हणाले,” त्या व्यक्तीने किमान एक झाड लावून त्याचं मनापासून संगोपन करत त्याला मुलाप्रमाणे वाढवावं, एका विद्यार्थ्यास एक झाड देऊन त्या झाडाचं संगोपन त्या विद्यार्थ्याने करावं ( एक विद्यार्थी – एक झाड ), एका कुटुंबाने एका झाडाची जबाबदारी घेत त्याला वाढवावं ( एक कुटुंब – एक झाड ) अशा विविध नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. वृक्षारोपण करून त्याचं योग्य ते संगोपन करत त्या रोपट्याला मोठ्या वृक्षात रूपांतर करावं आणि यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने मन लावून वृक्ष संवर्धनाच्या कार्यक्रमात उतरावं, हीच कळकळीची विनंती.सरपंच मारूती खामकर,ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ जाधव, ग्रामसेवक अनिल सुर्यवंशी उपस्थित होते.

