
वडगाव मावळ:
मावळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश काजळे यांची मावळ तालुका संजय गांधी निराधार अनुदान समिती सदस्यपदी निवड करण्यात आली.काजळे काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असून कुशल संघटक अशी त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागात त्याचा जनसंपर्क दांडगा आहे. यापूर्वी त्यांनी
तालुका युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आठ वर्ष , युवक काँग्रेस अध्यक्ष पदी पाच वर्ष काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले.मावळ तालुका दिंडी समाज सह सेक्रेटरी म्हणून काम केले आहे.
वारकरी संप्रदायासह सामाजिक कार्यात गणेश यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संजय जगताप व मावळ तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माऊली दाभाडे, काँगेसचे नेते यादवेद्र खळदे यांच्या शिफारशींनुसार काँग्रेस कडून त्यांना काम करण्याची संधी देण्यात आली.

