
वडगाव मावळ:
मावळ तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे संघटनमंत्री नारायण ठाकर यांची निवड करण्यात आली.
मावळ तालुक्यातील समितीवरील शासकिय व अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीचा चा आदेश नुकताच जाहीर करण्यात आला.
मावळ तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवरील अध्यक्ष व इतर नऊ
अशासकिय सदस्यांची नेमणूक उपमुख्यमंत्री,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्रान्वये शिफारस केलेली आहे,त्यानुसार ही समिती घोषित करण्यात आली.
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशाद्वारे शासकिय अशासकिय सदस्यांची मावळ तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदायोजना समिती पुढील प्रमाणे:
नारायण बाबुराव ठाकर(अध्यक्ष), रुपेश अशोक गरुड,
ज्योती दिपक मालपोटे,जयंत सुर्यकांत राऊत,शंकर महादु हेमाडे, गणेश वसंतराव काजळे,संदिप भोसलकर, अजिंक्य एकनाथराव टिळे, संतोष रामचंद्र गिरी, राजेंद्र अरुण करंडे(सर्व सदस्य)पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका मावळ(शासकिय प्रतिनिधी)सदस्य
तहसिलदार (शासकिय प्रतिनिधी) तालुका मावळ(सचिव)

