टाकवे बुद्रुक: पाच दिवसांपासून नळाला पाणी आलं नाय,त्यात विहीर बारव आटलेली. हातपंपाची सोय नाही. मग पाण्यासाठी बाया बापडयांची वणवण सुरू झाली. तहानलेल्या गावक-यांना विकत आणून पाणी पुरवठा देवाभाऊ गायकवाड मित्र परिवाराने पाण्याची सोय केली,आणि तहानलेल्या गावकऱ्यांना पाणी मिळाले. त्यातच झाल अस गेले ५ दिवसापासून मानकुली अनसुटेत पाणी नसल्यामुळे तळ्यावर जावं लागायचं. परंतु देवाभाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या माध्यमातून सोमनाथ भाऊ मोधळे ,भरत भाऊ घाग , दिनेश भाऊ मोधळे, दत्ताराम घाग,प्रकाश घाग यांनी अनसुटे-मानकुली गावाला ५०००लीटर पाणी देऊन समस्या सोडवली गावकर्यांनी देवा भाऊ गायकवाड यांचे आभार मानले.

error: Content is protected !!