
वडगाव मावळ:
महाविकास आघाडीने मावळ तालुक्यात वसुलीचे टार्गेट दिले आहे का ? असा सवाल माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केला आहे. मावळातील प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या बाहेर एजंटाचा सुळसुळाट वाढला असल्याचा घणाघाणात करून बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाचे वाभाडे काढले आहे.
वडगाव मावळ येथील पंचायत समिती कार्यालयात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन प्रशासनासह महाविकास आघाडीवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
पत्रकार परिषदेला मावळ पंचायत समितीच्या सभापती निकिता घोटकुले,भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, भाजपाचे माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे,प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,, माजी सभापती सुवर्णा कुंभार,माजी उपसभापती शांताराम कदम, माजी उपसभापती जिजाबाई पोटफोडे,गणेश गायकवाड,
जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले,
पंचायत समिती सदस्य ज्योती शिंदे,,माजी उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर ,नगरसेवक किरण म्हाळसकर,दिनेश ढोरे,दिपाली मोरे, संदीप काकडे उपस्थित होते.
बाळा भेगडे म्हणाले,”महाराष्ट्रातील अग्रगण्य तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील महाप्रताप जनतेला दिसत आहे. शांत व सुनियोजित विकास तालुक्याची ओळख नाहीशी होत आहे याची खंत वाटते.
मावळाला निसर्गाने खूप काही दिले पण नैसर्गिक संपत्तीची लूट करायचे काम पद्धतशीरपणे दबावतंत्रात सुरू आहे. तालुक्यातील प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे अधिकारी बेभानपणे (सुसाट) सुटले आहे. अधिकारी व एजंट यांनी तालुका विक्रीला काढला आहे का ? प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे अधिकारी संगनमताने मोठ मोठे आर्थिक उलाढाली करत आहे.
पुढे जाऊन बाळा भेगडे म्हटले,”
सरकारी कार्यालयांमध्ये झालेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे हे दिसून येत आहे.
गेल्या दीड वर्षातील लाचलुचपत विभागातील कारवाई आहे त्याचे उदाहरण आहे.
मावळ तालुक्यात
● १२ मार्च २०२० रोजी गाव कामगार तलाठी कार्ला- सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी १ लाख रुपये, ● २९ एप्रिल २०२० रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र वडगाव मावळ- उर्से
टोलनाक्यावर अडवलेल्या गाड्या सोडून देण्यासाठी १५ हजार रुपये लाच घेताना,
● २५ नोव्हेंबर २०२० रोजी दुय्यम
निबंधक लोणावळा जमीन खरेदी व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी २५ हजार रुपये लाच घेताना,
● ८ डिसेंबर २०२०
रोजी दुय्यम निबंधक वडगाव मावळ नोंदणी झालेल्या दस्तावर सही शिक्के मारण्यासाठी साडेसात हजार रुपयांची
लाच घेताना,
●१३ जानेवारी २०२१ रोजी खाजगी महिला तळेगाव दाभाडे- न्यायालयातील केसचा निकाल लावून
देण्यासाठी पन्नास हजाराची लाच घेताना,
● ६ मार्च २०२१ रोजी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक,
पोलीस कॉन्स्टेबल, कामशेत पोलिस स्टेशन मधील अटकेतील आरोपीला जामिनासाठी मदत करण्यासाठी एक लाख
रुपये लाच घेताना,
●६ एप्रिल २०२१ रोजी पवना नदी पात्रातून शेतीला पाणीपुरवठा परवानगी मिळवून देण्यासाठी
मोनिका नानावरे, सहाय्यक अभियंता, जलसिंचन विभाग पवनानगर यांना ९० हजार रुपयांची लाच घेताना
● ३१ मे२०२१ रोजी तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी व उद्यान निरिक्षक विशाल मिंड यांनी ठेकेदाराच्याबिलाचे राहिलेले पैसे देण्यासाठी नऊ लाख रुपये लाचेची मागणी. अशा लाचखोरीच्या घटना मावळ तालुक्यात वारंवार घडताना दिसत आहे. अशा कारवाई झालेल्या घटनांमुळे मावळच्या अस्मितेला धक्का बसला आहे.
अधिकाऱ्यांमध्ये सप्त-चर्चा आहे आम्हाला एवढे टार्गेट दिले आहे. पण टार्गेटमुळे मावळच्या जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी गुंतवणूक, येणारे उद्योग, वाढणारे नागरीकरण यावर याचा दूरगामी परिणाम होणार आहे. फसवणूक, खोटी जमीन व्यवहार, गुन्हेगारीकरण, कंपन्यांमध्ये होणारे दबावतंत्र, काम मिळवण्यासाठी खोटेनाटे दबावाचे राजकारण यामुळे तालुक्यातील वातावरण अशांत झाले आहे.म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये.
बाळा भेगडे म्हणाले,”
आघाडी सरकार येण्यापूर्वी विकासाचा तालुका अशी ओळख होती. औद्योगिकीकरण,नागरीकरण होते.
दबावामुळेच गुंतवणूक थांबली,सचिन वाझे सारखे मावळात किती एजंटचा सुळसुळाट झाला आहे. म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकवू नये.
तळेगावच्या मुख्याधिकारीला शिंगे फुटली, कामशेतचा पी आय उद्दिष्ट्य घेऊन.
अधिकाऱ्यांनी मावळाला बदनाम करण्याचा अधिकार नाही,इतक्या मोठ्या कारवाई होतेच कशी. मावळात पहिल्या सारखे वातावरण राहिले नाही. सरकारी कार्यालयातील गैरव्यवहाराला लगाम घालण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता पुढे सरसावले प्रशासनाने मग्रूरीरी सोडून काम केले पाहिजे. जनतेच्या प्रश्नांसाठी भाजप रस्यावर उतरून काम करेल.

