दादा,
सत्तर च्या दशका पासून ऐशी दशक ओलांडून अगदी नव्वदीच्या काहीसे अलीकडचा काळ. आई, वडील ग्रामीण भागात अशिक्षित होतेच, जवळपास ९० ते ९५ % टक्के अशिक्षितच असावेत.
मग, त्या काळात जन्मलेली मुले, मुली ज्या वेळेस शाळेत प्रवेश घ्यायचा बापा सोबत रडत रडत जायची तेव्हा, शाळेचा प्रवेश करताना त्या काळातील मास्तर ( शिक्षक ) पालकांना मुलांची जन्म तारीख विचारायचे, आई, वडिलांना प्रश्न पडायचा की काय सांगायचे आत्ता. मग ते भांबावून जायचे.
मग तो अमुक अमुक महिना होता, पहाट होती, दुपारी, संध्याकाळी , रात्री उशिरा माझा सोन्या मला झाला. त्या दिवशी अमूश्या होती.पूणव होती.अमुका हा सण होता.तमुक तो सण होता, अशी गमतीदार उत्तरे देऊन मस्तारला चक्रावून ठेवायची,मग सांगा नाव तुमच्या मुलाचे .
मुलाचे नाव काय तर दगड्या, धोंड्या, तुक्या, सख्या, गज्या, म॔ज्या, लक्ष्या , जिलेबी, लाडू अशी खूप गमतीदार नावे असायची, कशीबशी नावे लिहून झाली की मग वेळ यायची ती तारखेवर, नावे लिहून झाली की सर सकट १/६/१९७५, १/६/१९७६, १/६/१९७७ ते १/६/१९८० ८१, ८२, ८३ पर्यंत मस्तरला कळत नव्हते की एक किंवा दोन दिवस आड तारीख लिहावी म्हणून, त्या काळात 2 वर्षांआड झालेली एकाच घरातील बहीण भाऊ ( भावंडे ) यांचा आजच्या काळात १ / ६ / लाच वाढदिवस येतोय,.
मग, लग्न होऊन वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलेले बहीण भाऊ शुभेच्छा तरी कोणाकोणाला देणार ? आहे की नाही गमंत, म्हणून १ / ६ ला ज्याचा वाढदिवस असेन त्यांच्यासाठी सार्वजनिक वाढदिवस दिन साजरा करायला काहीच हरकत.
आणि म्हणूनच मनातून बोलावसं वाटतंय की आमचा १/६ च्या तारखेचा वाढदिवस आला की आनंदच होत नाही, कारण जन्म तर झालाय पण ही तारीख फेक ( खोटी ) आहे, आनंद एव्हढाच होतोय की आमच्या आई, वडिलांनी आम्हाला जन्म देऊन काबाड कस्ट करून मोठे केले.
वाढवले, कशी बशी शाळा शिकवली आणि म्हनुन तर आज आम्ही, या जगात ताठ मानेने फिरतोय. बाकी वाढदिवस आणि तोही १/६ आहेच की. आनंद अजून एक वाटतो की, पत्नी ओवाळयाला येते, मुले केक आणतात, आणि मित्र वाढदिवसाची पार्टी मागतात खूप आनंद वाटतो
( शब्दांकन- बाळासाहेब घाडगे )

error: Content is protected !!