
तळेगाव दाभाडे :
खळदे आळीतील अभय नंदकुमार जगदाळे(वय ४०) वर्ष अल्पशा आजाराने निधन झाले.तळेगावात रिक्षा संघटना, मुरलीधर मंडळ ,मुरलीधर तालीम अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या मागे पत्नी ,एक मुलगी, एक मुलगा, भाऊ, भावजय,चुलते,आई ,वडील, आजी, आजोबा असा परिवार आहे.अभय यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.