कामशेत:
शाळेतच तो भूमिती आणि विज्ञानाच्या सुबक आकृती काढायचा. को-या कागदावर पेन्सिलने उभ्या आडव्या रेषा मारून तो सुबक चित्र काढण्यात ही तरबेज होता. त्याची ही आवड दिवसेंदिवस वाढत गेली. आता तो को-या कागदावर आपल्या प्रियजनांच्या हुबेहुब छबी काढतोय.
त्याच्या या कलेचे आई, वडील, आजी ,आजोबांना भारी कौतुक आहे.कोरोना मुळे लाॅकडाऊन वाढले.घरात बसून दिवसभर करायच काय,या विचारात तो गुरफटून गेला नाही. रोज तो वेगवेगळी चित्रे रेखाटून सराव करीत आहेत. कामशेतचा साहील गणेश भोकरे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
तो कामशेतच्या पंडीत नेहरू विद्यालयात अकरावी आर्ट्स मध्ये शिकतोय. आजी;आजोबा,काका यांची चित्रे काढून रंगवून झाल्यावर,त्याने मावळचे आमदार सुनिल शेळके यांचे चित्र रेखाटून शेअर केले. साहीलचे वडील
गणेश यांनाही सजावटीच्या कामाची मोठी आवड आहे. गणेशोत्सवात त्याच्या घरगुती सजावटीला तोड नसते. खूप आकर्षक सजावट गणेश करतो. गणेश कामशेत शहर शिवसनेचे माजी शहरप्रमुख आहे.
साहीलचे आजोबा रामदास भोकरे कट्टर शिवसैनिक त्यांनाही सामाजिक कार्याची आवड,तेही सजावटीच्या कामात अग्रेसर असतात. रंगरंगोटी पहिल्या पासूनच वारसा असलेल्या साहीलने युट्यूबच्या मदतीने माणसाचे चेहरे स्केच करण्याचे प्रशिक्षण घेतले.
त्याच आधारावर त्याने काढलेल्या चित्रांचे कौतुक होऊ लागले आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके तालुक्यातील तरूणांमध्ये लोकप्रिय आहे. त्याच्या सोबत सेल्फी काढायला तरूण पिढीचे नेहमीच पुढे असतात आमदार शेळके साहेबांबरोबर आपला फोटो यावा यासाठी जिथे जिथे आमदार साहेब सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतात,तेथे त्याच्या सोबत मोबाईल मध्ये फोटो घ्यायला सगळे धडपड करतात.
आमदार शेळके साहेबांची मोठी क्रेझ आहे,याच अनुषंगाने अकरावीत शिकणा-या साहिलने आमदार साहेबांचे काढलेल्या चित्राचे साहीलच्या मित्रपरिवारात कौतुक होत आहे.

error: Content is protected !!