
देहूरोड:
केंद्रातील मोदी सरकारच्या ७ वर्षाचे अपयश , लसीकरणात आलेले अपयश, पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव आणि महागाई,ढासळती अर्थव्यवस्था नोटबंदी आणि जीएसटी मुळे झालेली देशाची दुदंशा वाढती बेरोजगारी, शेतकरी व कामगार विरोधी कायदे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की अशा मुद्यांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने फलकबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी व जिल्हा काँग्रेस कमेटी यांच्या आदेशा नुसार देहूरोड कॉग्रेस कमेटीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे,त्यावेळी उपस्थित देहूरोड ब्लॉक कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष व देहूरोड केंटोनमेंट बोर्ड चे नगरसेवक हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तु, आणि नगर सेवक गोपाल यशवंतराव तंतरपाळे, महिला अध्यक्ष,सौ ज्योती शंकर वैरागर ,पूणे ज़िला महिला उपाध्यक्ष रानी पाड़ियन कार्यकर्ते गीता राजलिंगम रामनारायण, प्रमोद रोकड़े , वेंकटेश कोळी, गफूर भाई शेख, संभाजी हरीभाऊ पिंजन,वासंती वेटरीवेल, सायबू तेलगू, अशोक कूसळे, संगीता वरदा, जावेद सिकीलकर,पोपट मोहीते,माणीकराव वाघमारे,आसीब सय्यद , अबु वीरन उपस्थित होते.


