तळेगाव स्टेशन:
कोरोनाचे संकट दूर करायला सगळ्या यंत्रणा एकवटलेल्या आहेत. सामाजिक संस्थांनी या साठी पुढाकार घेतला आहे. आणि स्वयंसेवक स्वयंपूर्तीने या लढ्यात सहभागी होत आहेत. संकट कोरोनाचे असो की,अन्य कोणते रूग्णांना उपचारादरम्यान रक्ताची गरज भासते.
आजमितीला रक्तपेढीत रक्त तुटवडा जाणवू लागला आहे. मे आणि जून महिन्या दरम्यान सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतो. त्यात कोरोना-१९ चा प्रादुर्भाव वाढत चाललेला आपण पाहत आहोत. रक्तदान करणारा युवक महाविद्यालय बंद असल्याकारणाने इच्छा असूनही रक्तदानापासून वंचितच आहे, असे म्हटले तर वावगे वावगे ठरू नये.
कोरोना-१९ मुळे कारखाने, विविध छोटे उद्योग धंदे हे देखील रक्तदान चळवळी मध्ये अग्रणण्याने सहभागी असतात पण हे कारखाने, उद्योग धंदे देखील बंद असल्याने रक्त संकलनास अडचणी येत आहेत.
या अवघड पण शक्य असलेल्या मोहिमेत विविध सामाजिक संघटना,छोट्या नागरी वस्त्या यांचा सहभाग मिळविण्यासाठी पदाधिकारी यांनी सहभाग घेतल्यास रक्तपेढीत निश्चित रक्तसाठा वाढेल.
या साठी रक्तदात्यास आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने शक्य तेव्हा रक्तदान करावे. तळेगाव दाभाडे येथील भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालय,गरवारे रक्त केंद्रास अशा शिबिरामधून आवश्यक ते रक्त संकलन होऊन गरीब,गरजू रुग्णांच्या सेवेत मोलाचे योगदान दिले जाते, आजची गरज ओळखून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्त करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
संपर्क साठी
एम.आय.एम.ई.आर.वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगांव ग्रामीण रुग्णालय, चे गरवारे रक्त केंद्र, तळेगांव दाभाडे, ता.मावळ येथील जनसंपर्क अधिकारी राहुल पारगे यांनी केले.
याच रुग्णालयातील डाॅ विजयकुमार पोवार यांच्या पत्नी वंदना विजयकुमार पोवार यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान केले .
आपणास रक्तदान करायचे असल्यास अधिक माहितीसाठी:
फोन -०२११४-३०८३९९
डॉ. विजयकुमार पोवार
एम.डी. शरीर विकृती शास्त्र.
-रक्त संक्रमण अधिकारी
९६०४८ ७१४७१
राहुल पंढरीनाथ पारगे
-जनसंपर्क अधिकारी
९९६०० ८९०८९
यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!