सामाजिक कार्याचा वसा लाभलेला युवक नेता अशी बिरुदावली मिळून, गावपातळीवर तळागाळापर्यंत पोहोचून काम करणा-या एकता प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब घारे यांच्या वाढदिवसानिमित्त डोणे येथे सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
एकता प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कारके व उपाध्यक्ष रवि काळभोर यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एकता प्रतिष्ठाणच्या डोणे गांवात सॕनिटायजरचे वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी उद्योजक डी.एस.पांदिलवार उपस्थित होते पवनमावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष चंद्रकांत चांदेकर, योगेश कारके ,रवि काळभोर,.रणजित, समिर खिलारे,मल्हारी खिलारी ,संदेश चांदेकर ,विश्वास चांदेकर व प्रतिष्ठाणचे सर्व सभासद उपस्थित होते.
आज पासून गांवामध्ये सुरू झालेले सॕनिटायजरचे वाटप येत्या दोन दिवसात पुर्ण होईल.
गावातील विविध उपक्रमात प्रतिष्ठाणच्या वतीने सहभाग घेतला जातो. यापूर्वी केलेल्या सामाजिक उपक्रमासारखे यापुढेही प्रतिष्ठाणच्यावतीने गांवामध्ये सामाजिक व विकासाचे उपक्रम राबविले जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कारके व उपाध्यक्ष रवि काळभोर यांनी सांगितले .
एकता प्रतिष्ठेचे संस्थापक बाळासाहेब घारे,एक शांत,संयमी,सुस्वभावी व्यक्तीमत्व म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. तालुका पातळीवर देखील ते कार्यरत आहे. माझा गाव आणि परिसर यांचे आपण देणे लागतो,या भावनेतून सातत्याने विधायक कामासाठी आग्रही असलेल्या या यूवक नेत्याला गावाचा कनवळा आहे.
लहान मोठ्यांशी मिळून मिसळून,आपुलकी व प्रेमाने वागून लोकसंग्रह जोपासणारा या नेत्याने,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित आहेच,ऑक्सिजन निर्मितीत झाडांचे महत्व अनन्यसाधारण आहे,याच धर्तीवर वृक्षारोपणाचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!