
वडगाव मावळ:
सेवासप्ताह निमित्त भारतीय जनता पार्टी वडगांव शहराच्या वतीने वडगांव येथील पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यशस्वीरित्या सात वर्षांचा कालावधी पुर्ण होत असताना वडगांव शहर भाजपचे वतीने मागील वर्षभराच्या काळामध्ये कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा म्हणून काम करणारे शहरातील सर्व पत्रकार बंधू यांना माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचे हस्ते व पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेशराव भेगडे, तालुका भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, युवक अध्यक्ष संदीप काकडे, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम नगरसेवक अरुण भेगडे, व वडगांव शहर अध्यक्ष किरण भिलारे यांच्या हस्ते सन्मानित केले.
याप्रसंगी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मनोगत व्यक्त करत असताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सात वर्षीय भ्रष्टाचार मुक्त सरकारच्या विविध लोकोपयोगी कार्याची माहिती दिली.
तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले व वडगांव शहर भाजपचे वतीने पुढील काळात देखील असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही दिली.
तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी आपल्या मनोगतामध्ये वडगांव शहर भाजपने केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा म्हणाले,” वडगांव शहर भाजपचे कार्य हे लोकोपयोगी असून अनेक सामाजिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने समाजाचे हित जपण्याचे काम करत आहेत.
याप्रसंगी तालुका प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे,,सरचिटणीस सुनिल चव्हाण,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,नगरसेवक, प्रविण चव्हाण,किरण म्हाळसकर, प्रसाद पिंगळे, अॅड. विजयराव जाधव, मा सरपंच नामदेवराव भसे, विकास शेलार, व्यापारी आघाडी मोर्चा भूषण मुथा, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रवींद्र काकडे, शंकर भोंडवे, शेखर वहिले, शरद मोरे, विनायक भेगडे, केदार भेगडे , प्रविण ढोरे आदी उपस्थित होते.
स्वागत शहराध्यक्ष किरण भिलारे यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर यांनी केले. आभार युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे यांनी केले.
विजय सुराणा ( लोकमत),ज्ञानेश्वरजी वाघमारे ( सकाळ), गणेश विनोदे (पुढारी),सुदेश गिरमे ( पुण्यनगरी),महादेवजी वाघमारे (प्रभात),प्रभाकर तुमकर (एम पी सी न्यूज),दत्तात्रय म्हाळसकर (महाराष्ट्र लाईव्ह),सतीश गाडे (नवराष्ट्र),संजयजी दंडेल (मावळ न्यूज),या पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला.

