वडगाव मावळ:
मोदी सरकारच्या सात वर्षाच्या यशस्वी कार्यपूर्ती निमित्त मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने कान्हे, तळेगाव टाकवे, येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पीपई किट, सॅनिटायझर, मिठाई वाटप करण्यात आले.
तसेच कोरोना काळात जनतेची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम, गणेश गायकवाड,युवा नेते देव गायकवाड, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, गणेश कल्हाटकर, नगरसेवक अरुण भेगडे, सरचिटणीस सुनिल चव्हाण,भाजपा मावळ प्रसिद्धीप्रमुख संदीप सातकर, उपसरपंच महेश सातकर,केदार भाऊ भेगडे नवनाथ सातकर, शशिकांत कुटे, केतन सातकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा मावळ प्रसिद्धी प्रमुख संदीप सातकर यांनी केले.

error: Content is protected !!