वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात शनिवारी (दि.२९ ) सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८७ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.दिवसभरात ९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ग्रामीण भागात वाढणा-या रुग्ण संख्ये बाबत खबरदारी घेण्याची गरज आहे. दिवसभरात आज एकही कोरोनाने मृत्यू झाला नाही.
१८२८ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.शहरी भागात १७ तर ग्रामीण भागात ७० रुग्ण
सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत
एकही रुग्ण सापडला नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या
हद्दीत १३ रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या
हद्दीत ४ रुग्ण आढळले.कोरोनाबाधितांची संख्या २१८४३ वर पोहचली आहे.१९५७८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
देवले व कुरवंडे प्रत्येकी ९, सोमाटणे ७,
तळेगाव दाभाडे ग्रामीण ६, साळुब्रे व धामणे प्रत्येकी५, आंबी, आंबळे, इंदोरी व कुसगाव बुद्रुक येथे प्रत्येकी
३, डोंगरगाव, केवरे व माऊ प्रत्येकी २, माळवाडी,
नवलाख उंब्रे, कुणे नामा, औंढे खुर्द, शिंदगाव, भोयरे,
वडेश्वर, फळणे, जांबवडे, वराळे व तुंग प्रत्येकी १ असे
७० रुग्ण सापडले.आतापर्यंत ४३८ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला.
तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक ७०७९, लोणावळा
नगरपरिषद हद्दीत३८०७ व वडगाव नगरपंचायत हद्दीत ११२६ रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८९.६३ टक्के आहे तर मृत्यू दर २.०१ टक्के आहे.
सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये ७७८
लोणावळा नगरपरिषदमध्ये १४६ वडगाव
नगरपंचायतमध्ये ७७ व ग्रामीण भागात ८२७ असे एकूण १८२८ रुग्ण आहेत,अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

error: Content is protected !!