
कामशेत: पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन कामशेत शहर युवक अध्यक्ष पदी चेतन वाघमारे यांची निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी दिले.
आपण समाजाचे काही तरी देणे लागत आहोत तसेच पोलीस बांधव आपले मित्र आहेत आपण त्यांना योग्य ते सहकार्य व मदत करणार आहोत असे मत आपल्या मनोगत मध्ये चेतन वाघमारे यांनी मांडले .
यावेळी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे यांनी शुभेच्छा दिल्या .
तसेच यावेळी देहूरोड शहर पोलिस फ्रेंड्स फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष लक्ष्मण शेलार ,अविनाश गरुड़ आदी मान्यवर उपस्थित होते.

