
देहू :
किरकोळ भांडणात आईवरून शिवी दिल्याच्या रागात
पतीने आपल्या १९ वर्षीय पत्नीचा गळा दाबून खून केल्याचीघटना देहूगाव वडाचा मळा येथे घडली आहे.
देहूरोड पोलिसांनी दोन तासांत खुनाचा उलगडा करीत
पतीला अटक केली आहे.
वैभव भगवान लामकाने (वय २४) असे आरोपी पतीचे नावआहे. पूजा वैभव लामकाने (वय १९) असे गळा दाबून खूनझालेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेचे वडील सोमनाथरामदास पाटील (वय ५०) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, वैभव आणि पूजा
यांचा चार महिन्यांपूर्वी आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता.देहूगाव वडाचा मळा येथील नामदेव निवास येथे दीडमहिन्यांपासून भाडेतत्त्वावर राहत होते. गुरुवारी सकाळीयांचा चार महिन्यांपूर्वी आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता.
देहूगाव वडाचा मळा येथील नामदेव निवास येथे दीड
महिन्यांपासून भाडेतत्त्वावर राहत होते. गुरुवारी सकाळी
हृदयविकाराचा झटका येऊन पूजा बेशुद्ध झाल्याचा बनाव
करीत वैभवने नातेवाइकांना फोन केला. मयत पूजाचे
वडील सोमनाथ रामदास पाटील यांना संशय आल्याने
पोलिसांना कळविले. वैभव याला देहूरोड पोलिसांनी
ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलिसांना वैभवने
उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीस खाक्यानंतर त्यानेगुन्ह्याची कबुली दिली.
काही दिवसांपासून दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद
निर्माण होत होते. रात्री दोघांमध्ये भांडण झाले होते.
भांडणामध्ये पूजाने आईवरून शिवी दिली. याचा राग मनात धरून वैभवने तिचा गळा दाबून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

