
चाकण:
किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने अनेक वर्षे किल्ले संग्रामदुर्ग च्या जतन जपणूक व संवर्धनाचे काम अव्याहत पणे चालू आहे. त्यामध्ये एक पुढचे पाऊल म्हणून किल्ल्यात हायमास्ट लाईटचे उद्घाटन पार पडले.
चाकणच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारा किल्ला हे चाकणकर नागरिक व पंचक्रोशीतील नागरिकांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले संवर्धन व स्वच्छता या विषयाचे अनेक उपक्रम चाकणकर नागरिकांच्या सहभागातून चालू असतात.
मात्र या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन समाजकंटकांकडून अनेक प्रकारचे गैरकृत्य होत असतात. याला आळा बसावा म्हणून प्रतिष्ठानने याठिकाणी हायमास्ट लाईट बसवावा यासाठी नगर परिषदेकडे पाठपुरावा केला. त्यासंदर्भात सदर कामासाठी पुरातत्व विभागाची परवानगी देखील मिळवली.
सदरकामासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला. त्याला यश येऊन हायमास्ट लाईट उद्घाटन करण्यात आले.
यावेळी चाकण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे ,प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. किरण झिंजुरके ,उपाध्यक्ष राहुल वाडेकर, संचालक ऋषिकेश बुचडे, योगेश साखरे, विजय जगनाडे, गणेश कड, जगन्नाथ गोरे, विजय ठाकूर, शिवप्रसाद परदेशी, निलेश देशमुख उपस्थित होते.

