टाकवे  बुद्रुक: टाकवे बुद्रुक विकास सोसायटीच्या वतीने 2020-21 चालू वर्षाच्या खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एक कोटी 75 लाखाचाचे कर्ज 350 शेतकरी सभासदांना वाटप करण्यात आले आहे. संस्थेचे सचिव मदन अडिवळे यांनी अशी माहिती दिली आहे.एकूण 622 सभासदांना कर्ज मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यानिमित्ताने बँकेत येणारे वयोवृद्ध नागरिक, तरुणवर्ग वाटप कर्ज घेण्यासाठी येत असल्यामुळे या ठिकाणी गर्दीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.यामध्ये प्रामुख्याने वयोवृद्ध महिला व पुरुष जास्त आढळून येत आहेत. बँकेच्या बाहेर रंगा लावण्यासाठी किंवा बसण्यासाठी कसल्याही प्रकारच्या उपाययोजना बँकेमार्फत करताना दिसून येत नाही. तसेच गावातील एटीएम मधून सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. एकीकडे शासन स्तरातून कोरोना प्रतिबंधक उपाय योजना केल्या जात आहेत. तर दुसरीकडे नियमाची पूर्णपणे पायमल्ली होताना दिसून येत आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित पुणे टाकवे बुद्रुक शाखा.
कर्जवाटप असल्यामुळे गर्दीचे प्रमाण जास्त आहे. ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या आत मध्ये घेऊन सोशल डिस्टन्सचे नियम पाळून त्यांना बसण्यासाठी सोय करण्यात येईल.तसेच तरुण नागरिकांस बँकेच्या बाहेर सोशल डिस्टन्स प्रमाणे चौकोन करून त्यांना उभे करून टोकन प्रमाणे खरीप हंगामाचे कर्ज वाटप करण्यात येईल. अशी माहिती पु.जि.म.स.बँक पुणे.विभाग अधिकारी गुलाबराव खांदवे यांनी दिली.

error: Content is protected !!