कामशेत : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर कामशेत बोगदा येथे समोर चाललेल्या ट्रकला मागुन येणाऱ्या कारची जोरदार धडक बसुन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यु झाला असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात अभिजित रामलिंग घवले ( डेप्युटी कमिशनर जीएसटी माजगाव मुंबई ) (वय ४५), शंकर गौडा यतनाल (वय ४५), यांचा अपघातात मृत्यु झाला असून अभिजित घवले यांची पत्नी शिल्पा अभिजित घवले ( वय ४० ) व चालक पंडित खंडू पवार ( वय ३७ ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मंगळवार (दि.२५) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे लेनवर कामशेत बोगद्याजवळ ( किमी नं.७२ ) येथे समोर चाललेल्या ट्रकला (क्र. एम एच ४५ एफ ४७१९) मागुन येणाऱ्या इनोव्हा कारची (क्र. एम एच ०८ ऐ जी ३७३७) जोरदार धडक बसुन भीषण अपघात घडला. जखमींवर सोमाटणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

error: Content is protected !!