
कामशेत :
खांडशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नवनाथ राणे यांनी वाढदिवसानिमित्त गावात कलमी आंब्याची रोपे वाटून वाढदिवस साजरा केला आहे.कोरोनाने ऑक्सिजनचे महत्व आणि किंमत अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर वातावरणात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणा-या ऑक्सिजन वाढीसाठी आपलाही हातभर लागावा या हेतूने राणे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी
वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत आहे. वन विभागाच्या
वतीने अनेकांना जंगली झाडे देण्यात येतात. परंतु
या जंगली झाडे असल्याने या झाडांचे संगोपन केले
जात नाही. वाढदिवसानिमित्त राणे यांनी कलमी
आंबे दिल्याने या झाडांचे आपल्या परिसरात
वृक्षारोपण करून त्याची नियमित देखभाल
करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यामध्ये या
आंब्यापासून उत्पादन सुरू झाल्यानंतर किमान
कुटुंबातील आंब्याची गरज भागणार आहे.
सरपंच नवनाथ राणे म्हणाले,”
सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील आमचे गाव हे पुणे
जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. आमच्या गावानंतर
शिरोता धरण व त्यानंतर रायगड जिल्हा लागतो.
रायगड जिल्ह्यातील वातावरण व येथील
वातावरणामध्ये साम्य असल्याने आंब्याचे
प्रायोगिक तत्त्वावर संगोपन करून भविष्यामध्ये
सर्व कुटुंबे आंबा उत्पादनात अग्रेसर करून
गावामध्ये आर्थिक उन्नती करण्याचा विचार आहे.
यावेळी निवृत्ती टाणे, आबाजी भवाटी, योगेश कुटे,
सोमनाथ टाणे, नीरज राणे, सुनील गायकवाड आदी
उपस्थित होते.

