
चालण्याचे फायदे जाणून घेऊया.
घड्याळात वेळ पाहून चालालयला सुरुवात करा.
●हृदयविकार दूर र
जर आपण दररोज वीस मिनिटे चालत असाल तर, यामुळे कोणत्याही प्रकारचे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका १९ टक्क्यांनी कमी होतो. दररोज बराच वेळ आणि स्पीडने चालण्याने आजार दूर पळतात.
●रक्तातील शर्करावर नियंत्रण
दररोज जेवणानंतर चालणे हा उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते. दररोज जेवल्यानंतर १५ मिनिटं चालण्याने रक्तातील साखर नियंत्रणात येऊ शकते.
●सांधेदुखी
सांधेदुखीवर तर चालणं उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे स्नायू बळकट होतात. ज्यांना आर्थराइटिस आहे त्यांनी दररोज वॉक केलंच पाहिजे.
●रोगप्रतिकारशक्ती वाढवते
वातावरणातील बदलामुळे लगेच खोकला आणि सर्दी होण्याचा त्रास असेल तर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज चालावे.
●मेंदूसाठी उत्तम
आठवड्यातून किमान २ तास चालण्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.
●वजन नियंत्रित ठेवण्यास मदत
दररोज ३० मिनिटं चालल्यास लठ्ठपणाची समस्या ५० टक्क्यांनी कमी होते. चालण्यामुळे स्नायु मजबूत होतात आणि कामं करण्याचा उत्साह वाढतो.
●मूड चांगला राहतो
दररोज किमान ३० मिनिटं चालण्याने मूड चांगला राहतो. यामुळे आपल्यामध्ये तणाव, भीती, नैराश्य आणि नकारात्मक विचार देखील कमी होतात आणि ऊर्जा देखील वाढते. मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.

