सोमाटणे:
मित्रांसमवेत नदीवर पोहायला
गेलेल्या तरुण नदीत बुडाल्याची घटना पवना नदीत सोमाटणे येथे घडली.
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत
परमेश्वर वाकळे (वय १८ रा. भोई आळी, तळेगाव
दाभाडे) असे नदीत बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
तळेगाव दाभाडे येथील काही तरुण पोहोण्यासाठी
रविवारी दुपारी सोमाटणे येथील पवना नदीवर गेले होते.
त्यापैकी एका जण पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात
बुडाला.
यावेळी इतर पोहणाऱ्या तरुणांनी आरडाओरड
केल्याने सदर घटनेची माहिती पोलीस महिला दक्षता
कमिटीच्या सदस्या मंगल मुहे यांना समजताच त्यांनी
शिरगाव पोलिसांना खबर दिली.

error: Content is protected !!