
टाकवे बुद्रुक:
भोयरे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे बुद्रुक यांच्या सहकार्याने भोयरे येथे शंभर लोकांची मोफत रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये ९० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला,तर १० अहवाल पॉझिटिव्ह आले.या १० जणांना समुद्र कोविड सेंटर टाकवे खुर्द या ठिकाणी उपचारास पाठविले.सदर शिबिरास गाव पातळीवर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला.
स्वेच्छेने लोकांनी तपासणी केली.यावेळेस भोयरे ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बळीराम राणूजी भोईरकर, ग्रामसेवक प्रमिला सुळके, पोलीस पाटील मंगेश आडिवळे उपस्थितीत होते.
आरोग्य अधिकारी डॉ.धन्वंती साळे ,आरोग्य सेवक अरीफ शेख,लॅब टेक्निशियन शुभम गायकवाड यांच्या पथकाने ही तपासणी केली.
ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर खुरसुले, गजानन भोईरकर, शंकर भोईरकर,आशा वर्कर आशा खडके, अंगणवाडी सेविका मंदा आडिवळे,मदतनीस आशा डोळस यांचे सहकार्य लाभले.

