लोणावळा(नवनाथ आढाव) :
गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस बाळगणाऱ्यांला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
 के.के उर्फ   खंडू अशोक कालेकर (रा.पवनानगर, ता. मावळ) असे या अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. 
    लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,” सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांना पवनानगर येथे खंडू अशोक कालेकर हा अवैध रित्या अग्नीशस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे काँवत यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करून त्यांना पवनानगर येथे पाठविले.
या पथकाने के.के यांच्या घराजवळ सापळा लावत त्याला बाहेरून आवाज दिला, तो घरातून बाहेर येऊन पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळेस पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेवून त्याची अंग झडती घेतली.
त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल व तिन जिवंत काडतुसं मिळून आली.  या आरोपीस लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेवुन त्याच्या विरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) नुसार गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हयाचा तपास लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे करीत आहेत.
   सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, लोणावळा उप विभागीय पोलिस अधिकारी नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उप निरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक अमित ठोसर, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक संतोष शेळके, पोलीस शिपाई स्वप्निल पाटील यांनी केली.

error: Content is protected !!