कार्ला:
भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या साते मावळ येथील तरूणाचा उपचारादरम्यान सोमाटणे तील खाजगी रुग्णालयात निधन झाले. राजु सोपान गावडे असे अपघातात मृत पावलेल्या तरूणाचे नाव आहे.
तीन दिवसापूर्वी राजू कार्ला फाटकाच्या पुढे पुणे मुंबई महामार्ग ओलांडून जात असताना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहने दिलेल्या धडकेत राजू गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी तातडीने सोमाटणे तील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी दि. २२रोजी सकाळी उपचारादरम्यान तो जग सोडून गेला. त्याच्या मागे आई,वडील,पत्नी,तीन मुले,भाऊ असा परिवार आहे. राजूच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!