टाकवे बुद्रुक:
गावपातळीवरील विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.कोरोनाचे संकट कमी होताच सर्व नियोजित विकास कामे आमदार सुनिल (अण्णा)शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने राबवू अशी ग्वाही टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले यांनी दिली.
ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर ते बस स्टॉप येथे सिमेंटकाँक्रीट रस्त्याच्या भूमीपूजन प्रसंगी सरपंच असवले बोलत होते. अंदाजपत्रकीय रक्कम रूपये 300000 लक्ष तसेच ग्रामपंचायत कार्यालय ते विविध कार्यकारी सोसायटी ऑफिस पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता करणे अंदाजपत्रकीय रक्कम 100000 लक्ष हे काम ग्रामपंचायत फंडा मधून करायचे आहे.
या कामांचा शुभारंभ सरपंच भुषण बंडोबा असवले,उपसरपंच संतू पांडू दगडे,सदस्या सुवर्णा बाबाजी असवले, सदस्य ऋषीनाथ पांडुरंग शिंदे ,माजी उपसरपंच अविनाश मारुती असवले ,सदस्या प्रतीक्षा अतुल जाधव ,सदस्य परशुराम कांताराम मालपोटे, सदस्या प्रिया शेखर मालपोटे , सदस्या संध्या दत्तात्रय असवले , सदस्या ज्योती दिलीप आंबेकर , सदस्य श्री सोमनाथ शांताराम असवले , ग्रामविकास अधिकारी एस बी बांगर ,चेअरमन मारुती तुकाराम असवले ,राष्ट्रवादी यूवकचे माजी अध्यक्ष शेखर गबळू मालपोटे ,सोपान गुनाट , सुभाष बाफना, बाळू जाधव , विजय जाधव उपस्थित होते.

error: Content is protected !!