कामशेत:
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी रात्रंदिवस झगडणा-या डाॅक्टर,परिचारिका,आरोग्य कर्मचारी,पोलीस प्रशासन यांच्या बद्दल सातत्याने ऋण व्यक्त केल्याच्या अनेक घटना आपण पाहतो.पण कोरोनाचे हे संकट दूर जाऊन,सर्वाना उत्तम आरोग्य लाभो. या संकटातून सगळे बरे व्हावेत यासाठी कामशेत येथील महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा आणि कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टचे डाॅ.विकेश मुथा यांनी सांगिसे तील कांबेश्वर महादेव मंदिरात रूद्राभिषेक करून ‘सर्वाच्या आरोग्यासाठी सहकुटुंब प्रार्थना केली.
कांतीलाल असलचंद मुथा,कांचनबेन कांतीलाल मुथा,
डाॅ. विकेश मुथा, सौ.अंजना विकेश मुथा,नील विकेश मुथा, काव्य विकेश मुथा यांनी गुरू महाराजांच्या उपस्थितीत अभिषेक केला. दिवसभराच्या रूग्णांच्या धावपळीतून वेळ काढून मुथा यांनी अभिषेक,महापूजा करून प्रार्थना केली.
डाॅ. विकेश मुथा म्हणाले, कोरोनाची दहशत संपवून सगळे कोरोनामुक्त व्हावेत. कोरोनाच्या आजारापेक्षा रूग्ण भीतीने मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करणारे डाॅक्टर,हाॅस्पिटलचा संपूर्ण स्टाफला उत्तम आरोग्य लाभावे. सर्वाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी.
नागरिकांनी थंडी तापाची लक्षणे,अंगावर न काढता तातडीने दवाखान्यात उपचारार्थ दाखल व्हावे.व्यायाम,प्राणायाम करून सकस आहार घ्यावा.

error: Content is protected !!