
वडगाव मावळ:
लोकनेते शरदचंद्र पवार साहेब देशाच्या राजकारणातील चाणक्य.वयाच्या २७ व्या वर्षी आमदार झालेल्या साहेबांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे .
राजकारणातील अनेक वादळ पार करून लोकप्रियतेच्या उफाट उंचीवर असलेल्या साहेबांची प्रसारमाध्यमात कायमच क्रेझ राहीली.
कॅमेरेत त्यांची छबी टिपायची असो, हेडलाईन करायची बातमी असो. सनसनाटी ब्रेकींग न्यूज असो की, मुलाखत असो. साहेबांच्या प्रत्येक शब्दाची दखल घेतली जाते. वर्तमानपत्र असो, नियतकालिक असो, विशेष अंक असो त्यात पवार साहेबांच्या व्यंगचित्राला जागा हमखास असतेच.
त्यांची पावसातील सभा, ईडीने दिलेल्या नोटीसाच उत्तर असो रस्त्यावर उतरून केलेले अंदोलन असो.पूर, भूकंप , गारपीट, वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी असो,त्यांची छबी टिपायला कॅमेऱ्यांच्या नजरा त्यांच्या वळलेल्या असतातच.
अनेकांनी त्यांची रेखाचित्र रेखाटली, अशाच समूहात कामशेतच्या आर्या परेश बरदाडे हिने साहेबांच्या चित्रांचे रेखाटन केले आहे. माऊंट सेंट हायस्कूलमधील नववीतील आर्याने साहेबांचे चित्र कागदावर रेखाटले आहे.
आर्याचे वडील परेश बरदाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.
ते साहेबांचे समर्थक त्यांनी हे चित्र सोशल मीडियावर शेअर केले, त्यामुळे बरदाडे बापलेकीचे कौतुक होऊ लागले आहे.